सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांना पाणी वाटप

सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने वारकरी भाविकांसाठी पाणी बॉटल वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी ज्योतिषचार्य सरकार वारे यांच्या हस्ते वारकरयांना पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव, शिवसेना उपविभागप्रमुख संदेश पावसकर, विनायक पोलजी, अभिजित कदम, सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक हेमंत सांगावेकर, अध्यक्ष शेखर परब, उपाध्यक्ष वैभव राऊळ, सचिव दिनेश गावडे, सदस्य विश्वनाथ राणे, अशोक गावडे आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यावेळी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या असंख्य दिंड्या, विविध पालख्या, वारकरी भक्त आषाढी एकादशी निमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात, या सर्व वारकरयांना सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठानतर्फे पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठानच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले. पाणी वाटप करताना वारकरी बंधू भगिनींनी प्रतिष्ठानच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिल्याने अधिकचे बळ मिळाले असल्याची भावना यावेळी अध्यक्ष शेखर परब यांनी व्यक्त केली असून, पुढील वर्षी देखील प्रतिष्ठानच्या वतीने जास्तीत जास्त वारकरयांची सेवाकरण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले.