पश्चिम क्षेत्रीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व बुद्दीस्टस आयुर्विमा कर्मचारी कल्याणकारी संघटना
मुंबई यांचे द्विवार्षिक अधिवेशन पुणे येथे संपन्न

दिनांक 19 जुलै 2025 रोजी पश्चिम क्षेत्रीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व बुद्दीस्टस आयुर्विमा कर्मचारी कल्याणकारी संघटना मुंबई यांचे द्विवार्षिक अधिवेशन हॉटेल प्रेसिडेंट कर्वे रोड पुणे येथे पार पडले यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथून सुमारे 400 पेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पाहिल्या सत्रात पुणे विभाग 1 चे वरिष्ठ विभाग प्रमुख माननीय संदीप गोखे, पुणे विभाग 2 चे विभाग प्रमुख माननीय अजय सपाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित होते, अखिल भारतीय पदाधिकारी माननीय आनंद प्रकाश टोपो, माननीय सुद्धार्थन, माननीय करकटे, माननीय चौधरी, माननीय मकवाना हे उपस्थित होते.
वरिष्ठ विभाग अधिकारी आणि अखिल भारतीय पदाधिकारी यांनी पाहिल्या सत्रात सर्व उपास्थीताना मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात यावेळी पश्चिम क्षेत्रीय कार्यकारिणी गठीत करण्यात आली. लोकशाही पद्धतीने आणि मतदान प्रक्रियेने पार पडलेल्या प्रक्रियेत माननीय गिरीश श्रॉफ राहणार गांधीनगर गुजरात यांची अध्यक्ष पदी तर माननीय दीपक वाघमारे यांची जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाली.
या सर्वांचे सामाजिक व कामगार क्षेत्रातून अभिनंदन होत असून भविष्यात माननीय गिरीश श्रॉफ व माननीय दीपक वाघमारे यांच्या नेतृत्वात संघटनेच्या पश्चिम क्षेत्रीय कार्यकारिणीच्या वाढीला अधिक चालना मिळेल अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.