पुण्यातील धानोरीत तब्बल ५००० किलो चिकनचे वाटप

येत्या २५ तारखेपासून श्रावण महिना सुरु होत असल्याने आखाड महिन्याचा हा शेवटचा रविवार आहे. खरंतर आखाड महिन्याचा हा शेवटचा रविवार म्हणजे प्रत्येक मांसाहारी खवय्यांसाठी पर्वणीच असते, यादिवशी सर्वच चिकन व मटण शॉपमध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात, अनेकदा या संधीचा पुरेपूर फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून अनेक मोठमोठ्या आखाडपार्ट्यांचे आयोजन करून केला जातो, त्यातच सध्या पुण्यामध्ये महानगर पालिका निवडणुकीचे वेध लागले असल्याने प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहे, परंतु धानोरी परिसरातील पुजा जाधव व धनंजय जाधव या दाम्पत्यांनी एक भन्नाट ऑफर राबवली आहे, ज्याची सर्वत्रच जोरदार चर्चा होत आहे.
या दाम्पत्यांनी शेवटच्या आखाड रविवार निमित्त तब्बल पाच हजार किलो चिकनचे मोफत वाटप केले आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला फक्त आपला आयडी दाखवायचा आहे. याची पूर्ण माहिती आयोजक धनंजयभाऊ जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ पुजा जाधव यांच्या कडून घेतली त्या म्हणाल्या खरंतर पुण्यासाठी आखाड पार्टी काही नवीन नाही. परंतु त्या आखाड पार्ट्यांच नियोजन जर आपण पाहिलं तर तिथे फक्त प्रतिष्ठित लोकांनाच निमंत्रण असतं आणि सामान्य नागरिक त्यापर्यंत पोहचत नाही. आणि म्हणून सामान्य गोर गरिबांना विशेषतः महिलांना याचा लाभ घेता यावा त्यांना या आखाडाचा आपल्या कुटुंबासोबत आस्वाद घेता यावा म्हणून हा उपक्रम राबविला आहे.
त्यांनी सांगितले आपण बघतोय अक्षरशह महिला सुद्धा या उपक्रमामध्ये सामील होताय, यात हेतू हाच होता की ज्यावेळी महिलांना वाटतं की आज आखाड आहे त्यावेळेस घरातील कर्ता पुरुष कोणत्या अवस्थेत घरी येईल हे सांगता येत नाही परंतु आपण घराघरांत चिकन दिल्यामुळे आज महिलांसोबत आणि कुटुंबासोबत कर्ता पुरुष सुद्धा आखाड सण साजरा करतोय याचाच आम्हाला आनंद होतोय. तर धनंजय जाधव म्हणाले आज आम्ही १ किलो चिकन देतोय ते प्रत्येक घरातील मुलगा, मुलगी, महिला, पुरुष हे सगळे जण खातील आणि घरामध्ये आनंदाने राहतील नाहीतर आपल्याकडे आखाड म्हटलं कि शेवटचा रविवार, दारूपिऊन पडणं, पार्ट्यांना जाणं धांगडधिंगा करणं याच्यापेक्षा आम्ही लोकांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेत आहोत अशी भावना व्यक्त केली.