सन रेडियंट सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

पुणे ता. १५ : सन रेडियंट सोसायटीमध्ये ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सोसायटीच्या महिला कार्यकारणी सदस्या सौ ख्याती राठोड मॅडम यांच्या हस्ते झेंडावंदन करून मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, कला-क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सोसायटीतील डॉ.विजयकुमार जाधव, श्री. संजय वाघमारे, सौ केतकी शिरबावीकर, डॉ.रचना अग्रवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ ख्याती राठोड मॅडम, सोसायटीतील सभासद तथा माजी मुख्याध्यापक काळे सर, सोसायटीचे चेअरमन श्री चेतन पाटील व सोसायटीचे सचिव श्री सचिन निमाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान सोसायटीतील स्वराली जोशी व त्यांच्या टीमने गणेश वंदना सादर केली तर सौ ख्याती राठोड व सौ प्रार्थना वाकचौरे यांनी सुंदर रांगोळीची आरास काढली, सोसायटीतील सर्वांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त वारसा संस्कृतीचा अशी थीम राबवली असून या थीमला साजेशी अशी वेशभूषा श्री किशोर पिसाळ व श्री शिवलिंग खुब्बा यांनी केली. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर पिसाळ यांनी यंदाच्या वर्षी राबविण्यात येणाऱ्या थीम बद्दल उपस्थितांना सखोल माहिती सांगून गणेशोत्सव सन २०२५ मधील कार्यक्रमांचे औपचारिक उद्घाटन केले.
एकंदरीत स्वतंत्रदिनाच्या सर्वच कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली व सोसायटीमध्ये एक चैतन्याचे वातावरण निर्माण केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री शंकर दादर यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अस्मी नेने व कुमारी शारवी वाकचौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री चेतन पाटील यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.