ताज्या घडामोडी
Trending

मल्हार वृत्त साप्ताहिकाचा पहिला अंक छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते प्रदर्शित…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला प्रसिद्ध.

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून मल्हार वृत्त साप्ताहिकाचा पहिला अंक दिनांक २६ जून २०२५ रोजी “छत्रपती संभाजी राजे” यांच्या हस्ते ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, पुणे कॉलेजच्या प्रांगणात प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी मल्हार वृत्त साप्ताहिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, ॲड. ओंकार येनपुरे, दादाराव बोबडे, विक्रम कदम, द्वारकेश जाधव, सुशील पांचाळ उपस्थित होते.

साप्ताहिकाविषयी माहिती देताना आज राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या जयंती दिनी मल्हार वृत्त साप्ताहिकाचे अनावरण छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते होणे हे आमचे भाग्यचं आहे. अशा भावना व्यक्त करण्यात आल्या, हे साप्ताहिक आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी पुणे लोहगांव येथून प्रसिद्ध होणार असून या साप्ताहिकात प्रामुख्याने शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, राजकीय बातम्यांचा समावेश असेल, तसेच सामान्य जनतेचे प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून सोडवण्यावर विशेष लक्ष देणार असल्याचे वृत्तपत्राचे मुख्य संपादक हेमंत दाभाडे यांनी सांगितले.

 

यावेळी वृत्तपत्राच्या वतीने मुख्य संपादक हेमंत दाभाडे, कायदेशीर सल्लागार ॲड. प्रमोद गरुड, सहसंपादक सचिन निमाले यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

मल्हार वृत्त च्या प्रत्येक अपडेट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : https://malharvrutta.com

युट्युब चॅनेल : https://youtube.com/channel/UCbzXPKJXIhzFzT9YLIUeZqw?si=xp6wFDln2U5XD4bs

फेसबुक : https://www.facebook.com/share/1F2PFWQqQs/

इंस्टाग्राम : https://www.instagram.com/malhar_vrutta?igsh=MWg2ajZtZWtwNXI2dw==

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!