शिक्षण विभाग

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सिम्बायोसिस विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ

पुणे, सातत्यपूर्ण प्रयत्नसमर्पित भावना आणि निश्चित उद्दिष्ट या त्रिसूत्रीच्या आधारे स्नातकांनी जीवनात यश संपादन करावे. भविष्यातील वाटचाल करतांना निश्चित उद्दिष्ट ठेवून त्याला कठोर परिश्रमएकाग्रतेची जोड दिल्यास आणि निराश न होता प्रयत्नरत राहिल्यास निश्चितपणे यश संपादन करता येईलअसे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

सिम्बायोसिस विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीप्रदान समारंभात राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती. डॉ. एस. बी. मुजुमदारप्र. कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकरकुलगुरू डॉ. रामकृष्णन रमनराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेकुलसचिव डॉ. एम. एस शेजुळ आदी उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणालेजीवनात थकवा येणे किंवा निराशा येणे स्वाभाविक आहेपण तिथे थांबून चालणार नाही. जीवनात केलेला प्रत्येक प्रयत्न जीवनाला आकार देण्यासाठी उपयुक्त असतोआनंद मिळविण्यासाठी असतो. आनंदी मन हे कार्यासाठी ऊर्जा देणारे आणि आपल्याला प्रेरित करणारे असल्याने आपण करीत असलेल्या कामाचा आनंद घेण्याची सवय ठेवावी. आतापर्यंत प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारे जीवनात यश संपादन करावेअशा शुभेच्छा श्री. राधाकृष्णन यांनी दिल्या.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणालेआज जगातील अनेक देशकुशल मनुष्यबळाच्या गरजांसाठी भारताकडे पाहत आहेत. विद्यार्थ्यांनी ही संधी साधण्यासाठी तयार असले पाहिजे. महाराष्ट्रातील विद्यापीठांना जर्मनफ्रेंचजपानीमँडरीनस्पॅनिशइटालियन आणि इतर भाषांमध्ये अल्प-मुदतीचे भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील नोकरीच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळेल. पुणे शहर वाहन उद्योगमाध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमुख केंद्र असल्याने विद्यार्थ्यांना इथे चांगल्या संधी उपलब्ध आहेतअसे त्यांनी सांगितले.

कुलपती डॉ. मुजुमदार म्हणालेविद्यापीठ वसुधैव कुटुंबकम‘ या ध्येयाने कार्य करीत असून विद्यापीठात विविध देशांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सारे विश्व एक कुटुंब आहे या भावनेनेच येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेतअसे ते म्हणाले.

राज्यपालांच्या हस्तेपदवी प्रदान समारंभात २२ देशातील ८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्र. कुलगुरू डॉ. येरवडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची व अभ्यासक्रमाची माहिती दिली.

000

मल्हार वृत्त च्या प्रत्येक अपडेट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

युट्युब चॅनेल : https://youtube.com/channel/UCbzXPKJXIhzFzT9YLIUeZqw?si=xp6wFDln2U5XD4bs

फेसबुक : https://www.facebook.com/share/1F2PFWQqQs/

इंस्टाग्राम : https://www.instagram.com/malhar_vrutta?igsh=MWg2ajZtZWtwNXI2dw==

Back to top button
Don`t copy text!