सन रेडियंट मंडळाचे गणेशोत्सव सण २०२५ साठी पदाधिकाऱ्यांची निवड
यंदाच्या वर्षी सन रेडियंट गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्राची लोकधारा थीम राबवणार

सन रेडियंट मंडळाचे गणेशोत्सव सण २०२५ साठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सन रेडियंट सोसायटी,कोंढवा बुद्रुक सोसायटीमध्ये दरवर्षी गणेश मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव निमित्त मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, याआधी मंडळाने शिवरायांच्या किल्ल्याची प्रतिकृती, कैलास पर्वत देखावा, अयोद्या येथील राम मंदिर प्रतिकृती, आकर्षक गणेश मंदिर प्रतिकृती असे अनेक देखावे सादर केले आहेत. गणेशोत्सवात सन रेडियंट सोसायटीतील सर्वच सभासद मंडळाच्या सर्वच कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावतात, सोसायटीतील लहान मुलांसाठी देखील मंडळाच्या वतीने मनोरंजक खेळांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या वर्षी सन रेडियंट गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्राची लोकधारा ही थीम राबवण्याचे ठरवले आहे. या विषयी बोलताना मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की सोसायटीमधील लहान मुलांमध्ये तसेच आसपासच्या परिसरातील लोकांच्या मनात महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा रुजवता यावी अशा उद्देशाने सर्वानुमते या थीमची निवड करण्यात आली असून. यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्न व यशस्वीरीत्या पार पडावा याकरिता सन रेडियंट सोसायटीतील मंडळाच्या वर्ष २०२५ करिता पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये किशोर पिसाळ यांची अध्यक्षपदी, बबन शेगर यांची कार्याध्यक्षपदी, नाथून सिंग यांची उपाध्यक्षपदी, केतन राठोड यांची सचिवपदी, आशिष साळुंखे यांची सहसचिवपदी, समीर देशपांडे यांची खजिनदारपदी तर संजय वाघमारे व शिवलिंग खुब्बा यांची सल्लागार समिती पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन चेतन पाटील, सचिव सचिन निमाले, कोषाध्यक्ष डॉ. विजयकुमार जाधव ज्येष्ठ नागरिक मल्लिकार्जुन खुब्बा, राजाराम खुटवड, सोसायटीतील गणेश मंदिर समितीचे पदाधिकारी अक्षय शिरबावीकर, प्रमोद पाटील, अतुल नेने यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीच्या वतीने मागील गणेशोत्सव काळात केलेल्या आकर्षक सजावटीची काही दृश्य खास मल्हार वृत्तच्या प्रेक्षकांसाठी.