क्रीडा व मनोरंजन
नृसिंह मुळे यांचा “लिंगायत समाज भूषण” पुरस्काराने सन्मान
नृसिंह मुळे हे मागील पंधरा वर्षापासून पुणे शहरात लिंगायत चळवळीत आहेत सक्रिय

नृसिंह मुळे यांचा “लिंगायत समाज भूषण” पुरस्काराने सन्मान
शिवा लिंगायत युवक संघटना लातूरच्या वतीने नृसिंह मुळे यांचा “लिंगायत समाज भूषण” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नृसिंह मुळे हे मागील पंधरा वर्षापासून पुणे शहरात लिंगायत चळवळीत सक्रिय आहेत. राज्यातील अनेक लिंगायत मोर्चामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. कर्नाटकातील बसवकल्याण येथील अनुभव मंटपच्यावतीने मागील अनेक वर्षापासून त्यांचा गौरव करण्यात येतो. अनेक वृद्धाश्रम व अनाथ आश्रमास सदैव मदत करत असतात. या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील, अॅड. सांबप्पा गिरवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.