क्राईम न्युज

एअर इंडियाचं विमान कोसळलं :

गुजरात, अहमदाबादमधील घटना

 

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचं विमान गुरुवारी (१२ जून) रोजी दुपारी १:३८ वाजता, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी विमानतळाच्या सीमेजवळ असलेल्या मेघानीनगर येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या वसतीगृहावर कोसळले. या दुर्घटनेत विमानातील प्रवाश्यांसह बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील काही प्रशिक्षणार्थी असे एकूण २६५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, विमानाचे अनेक अवशेष सभोवतालच्या इमारतींवर आदळले आणि विमानाचा स्फोट होऊन मोठी आग लागली. क्षणांत होत्याच-नव्हतं झालं घटनास्थळी आगीचे लोट, धुराचे लोट, स्फोट झालेल्या विमानाचे अवशेष, जळालेल्या वस्तू, जखमी माणसं आणि त्यांचे अवयव असं सगळं चित्र दिसत घटनास्थळी दिसत होतं. अपघातात अनेक प्रवाशांचे मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते, काहींचे मृतदेह अर्धवट तर काही पूर्णपणे जळालेले होते. घटनेची माहित कळतांच स्थानिक प्रशासनामार्फत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. विमानात अनेक व्हीव्हीआयपी प्रवासी देखील असल्याची माहिती मिळते, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. दुर्दैवाने त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून केवळ एक प्रवासी या दुर्घटनेतून बचावला आहे. या भीषण अपघातावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, आणि सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विमान ज्या भागात क्रॅश झालं, तिथल्या स्थानिकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली, आणि आता हे व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने शेअर केले जात आहेत.

  • विमान कोठे जात होते?
    एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ हे विमान एकूण २४२ प्रवाशांसह अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी निघाले होते.

 

  • कोणत्या देशाचे किती प्रवासी ?

मिळालेल्या माहिती नुसार एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ या विमानाने गुरुवारी (१२ जून) रोजी दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले, यावेळी विमानामध्ये एकूण २४२ प्रवासी होते, ज्यामध्ये २ पायलट, १० क्रू मेंबर्स आणि २३० प्रवासी होते. यापैकी १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.

 

  • विमान दुर्घटनेमागील कारण काय ?

समोर आलेल्या माहितीनुसार टेकऑफ केल्यानंतर दोन्ही इंजिनला पक्षी धडकले, त्यामुळे विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद झाले. पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळताच त्याने एमर्जन्सी सिग्नल देखील नियंत्रण कक्षाला दिला होता, पण दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद झाल्यामुळे काहीक्षणांत विमान कोसळले. या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स (Black Box) सापडला आहे विश्लेषणासाठी हा ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आला असून, लवकरच दुर्घटनेचं नेमकं कारण समोर येणार आहे.

 

 

  • बचाव कार्य :

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर विमान अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, केंद्रीय नागरी उड्डयण मंंत्री, नागरी उड्डयण विभाग सर्वांसोबत चर्चा केली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याशी देखील फोनेद्वारे चर्चा झाल्याचे अमित शाह यांनी सांगितलं. भारत सरकार, गुजरात सरकार आणि प्रशासनाचे सर्व विभाग यांना बचाव कार्याबाबतीत निर्देश देण्यात आले असून गृहमंत्री अमित शाहांनी काल घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अहमदाबादमधील घटनास्थळाला भेट दिली.

 

 

 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जखमींची भेट : 

या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून सुदैवाने सीट नंबर ११ A वर प्रवास करीत असलेला प्रवासी रमेश विकास कुमार हा एकच प्रवासी बचावला आहे, त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जखमींची भेट घेऊन विचारणा केली.

 

  • मृतांच्या वारसांना मदत :

विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समुहाने जाहीर केलं आहे.

 

  • हेल्पलाईन नंबर
    अपघातानंतर एअर इंडियाने १८००५६९१४४४ हा हेल्पलाईन नंबर जारी केला असून, मृतांच्या नातेवाईकांना एअर इंडियाची यंत्रणा पूर्ण सहकार्य करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!