केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासमावेत पुजाताई धनंजय जाधव यांनी केली पालखी मार्गाची पाहणी.
विश्रांतवाडी मुख्य चौक, पालखी विसावा दत्त मंदिर फुलेनगर येथे जाऊन केली पाहणी.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन येत्या एकोणीस तारखेला पुणे शहरात होत आहे. या पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासमावेत पुजाताई धनंजय जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी, व प्रशासकीय अधिकारी यांनी पाहणी केली.
विश्रांतवाडी मुख्य चौक, पालखी विसावा दत्त मंदिर फुलेनगर येथे जाऊन पाहणी करण्यात आली. गेले काही महिन्यांपासून विश्रांतवाडी चौकात पुणे महानगरपालिकेच्यावतीने भुयारी मार्ग व उड्डाणपुलाचे काम चालू आहे. याकामासाठी अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले असल्याने यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यासाठी असणारा पालखी मार्ग अपुरा पडण्याची शक्यता आहे
, दरवर्षी या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी , दिंड्या, पालख्या सहभागी होतात, या अनुषंगाने वारकर्यांना कोणताही त्रास होऊ नये तसेच दरवर्षी विविध संघटना, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या अन्नदान व आरोग्य शिबिरास कशाप्रकारे अडथळा निर्माण होऊ शकतो व त्यासाठी कोण्या उपाययोजना कराव्या लागतील याची माहिती पुजाताई धनंजय जाधव
यांच्या वतीने देण्यात आली, यंदाच्या पालखी सोहळ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा पाहणी दौरा महत्वाचा आहे, यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी आवश्यकत्या उपाय योजना व सहकार्य करण्याचे निर्देश संबंधीत प्रशासनाला दिले.
यावेळी पुणे पोलीस आयुक्त, पुणे मनपा आयुक्त, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबतच मा. नगरसेवक अनिल उर्फ बॉबी दादा टिंगरे,
सौ.पुजाताई धनंजय जाधव, मा नगरसेविका ऐश्वर्या जाधव, मा नगरसेवक सतिष म्हस्के ,मा नगरसेवक राहूल आप्पा भंडारे, अर्जुन जगताप, संतोष राजगुरू, मंगेश गोळे, सुभाष चव्हाण, चंद्रकांत जंजिरे, विनोद परांडे, बंटी म्हस्के, द्वारकेश जाधव, विनोद मोरे, रुपेश शिंदे यांच्यासह धानोरी, विश्रांतवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.