क्रीडा व मनोरंजन

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

कला व साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना मिळणार प्रति महिना 5000 रुपये मानधन

 

मुंबईदि. 27 : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना 5000 रुपये मानधन देण्यात येते. या योजनेसाठी 1 ते 31 जुलै 2025 दरम्यान आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 

 

या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे आणि दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करण्यात आली आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक आहे. विधवापरित्यक्त्यादिव्यांग व वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्यांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून आहेअशा कलाकारांनाच प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही नियमित पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. तसेचमहाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक असणे या पात्रतेच्या अटी आहेत.

 

 

अर्जदाराने अर्जासोबत वयाचा दाखलाआधार कार्डउत्पन्नाचा दाखलारहिवासी प्रमाणपत्रप्रतिज्ञापत्रपती-पत्नी एकत्रित छायाचित्र (लागू असल्यास)बँक पासबुकची प्रतअपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)शासनाचे इतर प्रमाणपत्रे (लागू असल्यास)नामांकित संस्था किंवा व्यक्तीकडून शिफारसपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

 

 

योजनेचे स्वरूप:
  • या योजनेत, ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा ठराविक मानधन दिले जाते.
  • या योजनेत, 34,600 कलाकार आणि साहित्यिकांचा समावेश आहे, ज्यांना एप्रिल 2024 पासून 5,000 रुपये मानधन मिळत आहे. 
  • ही योजना थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिली जाते. 
  • या योजनेअंतर्गत, कलाकारांना पुन्हा-पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. 
  • योजनेत, कलाकारांना 5,000 रुपये मानधन सरसकट दिले जाते. 

या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी आपले सरकार’ पोर्टलवर 31 जुलैपूर्वी अर्ज दाखल करावाअसे आवाहन मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. सुभाष काकडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!