क्रीडा व मनोरंजन

मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण

मुंबईदि. २७ : कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते २८ जून २०२५ रोजी सकाळी ११:५० वाजता होणार आहे. या सोहळ्याकरिता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर,  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यमंत्री तथा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध विकास कामांमध्ये रेल्वे स्टेशन चित्रीकरण स्थळनवीन वाडाचाळमंदिरअंतर्गत रस्तेदोन वस्तीगृहे इत्यादी कामांचा समावेश आहे. या कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. भविष्यातील बदलत्या तंत्रज्ञानाचा कल लक्षात घेता चित्रनगरीमध्ये सुसज्ज अशा पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.

उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास तसेच भूमिपूजन समारंभास चित्रपट क्षेत्राशी आणि नाट्य क्षेत्राशी निगडित कलाकार व मान्यवर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीमध्ये तीन चित्रीकरणे सुरू असून अनेक जाहिरातीमालिका आणि चित्रपटाचे चित्रीकरण नियमितपणे या चित्रनगरीमध्ये होत आहे. चित्रनगरीमध्ये झालेल्या विविध विकास कामांचा थेट सकारात्मक परिणाम इथल्या रोजगारावर व कलाकार तंत्रज्ञ यांना मिळणाऱ्या विविध संधीवर होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीनागरिकांसाठी दिनांक २८ जून रोजी पाहण्यासाठी नि:शुल्क खुली ठेवण्यात येत असल्यानेयाचा लाभ नागरिकांनी घ्यावाअसे कोल्हापूर चित्रनगरी मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर चित्रनगरी मार्फत शाहू स्मारक येथे दिनांक २८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता “चित्रसूर्य” या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे असून निवेदन श्रीरंग देशमुख व सीमा देशमुख हे करणार आहेतया कार्यक्रमामध्ये कार्तिकी गायकवाडमयूर सुकाळेअभिषेक तेलंगमाधुरी कुंभारशेफाली कुलकर्णीपियुषा कुलकर्णी हे नावाजलेले कलाकार सूर्यकांत यांच्या जीवनावर व त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवर गाण्यांमधून प्रकाश टाकणार आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार व अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापूर चित्रनगरी मधील विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम चित्रसूर्य या कार्यक्रमास उपस्थित राहावेअसे आवाहन कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक तथा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/वृत्त क्र. २७१३

Related Articles

Back to top button
Don`t copy text!