महाराष्ट्राचे लाडके भाऊजी होम मिनीस्टर फेम क्रांती नाना मळेगांवकर यांना बालगंधर्व परिवार 2025 पुरस्कार

बालगंधर्व रंगमंदिर कडून 57 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे लाडके भाऊजी होम मिनीस्टर फेम क्रांती नाना मळेगांवकर यांना बालगंधर्व परिवार 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक वर्षी बालगंधर्व परिवारातर्फे कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सत्कार म्हणून बालगंधर्व परिवार पुरस्कार प्रदान केला जातो.
यंदाच्या वर्षी होम मिनीस्टर फेमचे क्रांती नाना मळेगांवकर यांना बालगंधर्व परिवार 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हास्ते मिनीस्टर फेम क्रांती नाना मळेगांवकर यांना देण्यात आला. या प्रसंगी क्रांती नाना यांचे वडील धोंडीराम सुतार, पत्नी आश्विनी मळेगांवकर, मुलगी सह्याद्री मळेगांवकर यांनी पुरस्कार चा स्वीकार केला. विक्रम सुतार व क्रांती नाना यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील सर्व होम मिनीस्टर कार्यक्रम वर प्रेम करणाऱ्या व आशीर्वाद देणाऱ्या महिलांना समर्पित केला. या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातील दिग्गज मान्यवर व मराठी चित्रपट सृष्टी मधील अनेक कलाकार उपस्थित होते.