कृषी व व्यापार

शेतमालाच्या बाजारमूल्य निश्च‍ितीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क

 

मुंबईदि. २७ : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठीमा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पस्मार्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूसहळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. सेबीचे नियंत्रण असलेल्या एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेने (NICR) या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे.हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले.

 

हेजिंग डेस्क’ म्हणजे काय

        ‘हेज‘ म्हणजे बाहेरून येणा-या संकटांपासून संरक्षण देण्यासाठीत्यांना अटकाव करण्यासाठी बांधलेले साधनघराला जसे दारतसे शेताला कुंपण. किंमतीच्या चढ-उतारातून निर्माण होणाऱ्या संकटापासून संरक्षण देणारे जे साधन तेही एकप्रकारचे कुंपणच आहे ज्याला हेजिंग’ म्हणतात. भविष्यकाळातील कमी होणाऱ्या किंमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणे हा हेजिंग’ चा मुख्य उद्देश आहे. भविष्यकाळातील वाढणाऱ्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापर केला जाऊ शकतो. जागतिक बँकेच्या सल्ल्यानुसार आणि प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाच्या किंमतीतील जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजारात सहभागी होण्याकरिता तसेच त्यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी हेजिंग डेस्क’ (Hedging Desk) सुरु करण्यात आलेला आहे.

 

 

शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अनिश्चिततेपासून वाचवण्यासाठी हेजिंग डेस्क

            कृषी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याचा राज्याच्या सकल उत्पन्नात 12% वाटा आहे. मात्र राज्यातील शेतीमध्ये पिकांचे उत्पादन अजूनही नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. शेतीमध्ये पेरणी करूनही निश्च‍ित क्षमतेनुसार उत्पादन आणि उत्पादित मालाला योग्य भाव मिळण्याबाबत शेतकऱ्यांना नेहमीच चिंता असते. शेतकरी पिकांचे उत्पन्न घेतो तरी मालाची किंमत ठरवणारा नसतो. ही अनिश्चीतता कमी करण्यासाठी शासनाकडून देखील विविध शासकीय धोरणेसुधारित शेती पध्दतीविविध पिक विमा योजना यांचे पाठबळ शेतकऱ्यांना दिले जाते. शेतीतून किमान उत्पन्न मिळवण्यासाठी शाश्वत उपायोजना करणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेवून वैयक्त‍िक शेतकरीमर्यादित संसाधने लक्षात घेवून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील ज्ञान मिळावे यासाठी शासनाने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना बाजारातील अनिश्चिततेपासून वाचविण्यासाठी एककेंद्रीत समर्पित कृषी हेजिंग डेस्कची स्थापना पुणे येथे करण्यात आली आहे.        

 

हेजिंग डेस्कची कार्यपध्दती

             ‘हेजिंग डेस्क’ मध्ये भविष्यकालीन विविध पर्यांयाचा विचार करण्यासाठी व जोखीम व्यवस्थापनासाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना (CBBOs) यांना सेवा कमोडिटी कराराबद्दल तज्ज्ञ माहिती देतील. तीन हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हेजिंग साधने आणि धोरणांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बाजार ट्रेंडपुरवठा-तारणातील बदलजागतिक किमतींवर रिअल-टाइम मार्केट इंटेलिजन्सची माहिती देणे. शेतकरी उत्पादक संघटनाना व शेतकऱ्यांना शेतीजवळ साठवणूक केंद्रे उभारण्यासाठी एफपीओंना प्रोत्साहन दिले जाईल.

जोखीम व्यवस्थापन कक्षाअंतर्गत विविध प्रकारच्या जोखमींचा अभ्यास केला जाईल’, जोखीम निवारण करण्यासाठी धोरणे तयार केली जातील. मकाकापूस आणि हळदीसाठी ॲन्युअल कमोडिटी प्राईस रिस्क असेसमेंट रिपोर्टस (‘Annual Commodity Price Risk Assessment Reports’) तयार करून यामध्ये पिकाची सद्यस्थितीभविष्यकालीन अंदाज आणि धोरणविषयक उपाय सुचविले जातील. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज‘ विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. मकाकापूस आणि हळदीच्या उत्पादन आणि विपनणामध्ये सहभागी असलेल्या किमान ५० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वायदेबाजारातील व्यवहारासाठी नोंदणी व प्रत्यक्ष व्यवहार घडवून  आणले जातील.

 

एनसीडीईएक्स’ आणि स्मार्ट प्रकल्पाचे सहकार्य

            ‘एनसीडीईएक्स’ आणि स्मार्ट प्रकल्प यांच्यात ८ एप्रिल २०२५ रोजी हेजिंग डेस्कबाबत करार करण्यात आलाया कराराचे नाव शेतकरी उत्पादक संघटनासाठी हेजिंग डेस्कची स्थापना” असे आहे.या मध्ये  कापूसहळद आणि मका ही पिके पिकवणाऱ्या पट्ट्यांमधील शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात येईल.हिंगोलीवाशिमसांगलीयवतमाळअकोलानांदेडअमरावतीछत्रपती संभाजीनगरबीड येथे प्राधान्य देण्यात येणार आहे.या प्रकल्पाचे कार्यालय पुणे येथे उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम राज्यात सुरू झाले आहे.                         

              हेजिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळे सकारात्मक बदल होतील

 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निवडक कृषी वस्तूंच्या हेजिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळे (Hedging and Options Trading) अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. यामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. उदाहरणार्थपेरणी करताना जर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या पिकाच्या भविष्यातील विक्री किमतीबद्दल अनिश्चितता वाटत असेलतर तो ऑप्शन ट्रेडिंगचा वापर करून एक विशिष्ट किंमत निश्चित करू शकतो. यामुळेबाजारात कितीही चढ-उतार झाले तरी त्याला एक किमान सुरक्षित किंमत मिळते. हेजिंगमुळे अनपेक्षित बाजार बदलांपासून संरक्षण मिळते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाबद्दल अधिक खात्रीशीर नियोजन करता येते. परिणामीशेतकरी अधिक स्थिर उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित राहतात आणि त्यांच्या शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतील.

शेतकऱ्यांना याबाबत अधिक माहिती कुठे मिळेल

शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना (CBBOs)  व शेतकरी यांना हेजिंग डेस्कबद्दल माहिती व संपर्कासाठी पुढील क्रमांक आहेत.  हेजिंग डेस्क (Hedging Desk) साठी संपर्क प्रकल्प अंमलबजावणी कक्ष – कृषी (स्मार्ट प्रकल्प) कार्यालाय पुणे येथील संपर्क पुढीलप्रमाणे आहेत. निविष्ठा व गुणनियंत्रण तज्ज्ञ बाबासाहेब जेजुरकरमो. ९४०५००२८००पिक विश्लेषक डॉ. ब्रम्हानंद देशमुख मो. ९५६१४२१५०९एसीडीईएक्स आणि एनआयसीआर येथे (NCDEX – NICR) चे संपर्क- जोखीम निवारण व हेजिंग डेस्कचे प्रमुख सल्लागार नीरज शुक्ला मो. ९३२३६१४६२६रिस्क अ‍ॅनालिस्ट – जोखीम निवारण व हेजिंग डेस्क गौतम आठवले मो. ९४२०४१९४७०निधि  मिश्रा मो. ९०२९३९१८०६ संपर्कासाठी ई मेल आयडी- hedgingdesk.smart@gmail.com  आहे येथे  हेजिंग डेस्कच्या अनुषंगाने याबद्दल अधिक माहिती मिळेल. एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या https://www.ncdex.com  या संकेतस्थळावर about us मध्ये हेजिंग डेस्क बद्दल व  प्रशिक्षणाविषयीहेंजिंग डेस्क जनजागृतीपर माहिती देखील उपलब्ध आहे.

Back to top button
Don`t copy text!