‘ग्रीन धानोरी अभियान’ उपक्रमास सुरुवात ;
धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनच्या अध्यक्ष पुजा जाधवांचा पुढाकार

धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशन च्या पुढाकाराने धानोरी गाव व उपनगर परिसरात वृक्षरोपण व संवर्धनासाठी ‘ग्रीन धानोरी अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानास प्रारंभ झाला असून, आज मुंजाबावस्ती मधील बी. जी. टी. इ-लर्निंग स्कूल च्या प्रांगणामध्ये वृक्षरोपण करण्यात आले.
बी. जी. टी. इ-लर्निंग स्कूल चा शुभारंभ करण्यात आला असून, यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेत येताना पाऊसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने फाऊंडेशन च्या माध्यमातून छत्रीवाटप करण्यात आले. यावेळ मा. आमदार जगदीशभाऊ मुळीक, मा. नगरसेवक अनिल उर्फ बॉबी दादा टिंगरे व फाऊंडेशन च्या अध्यक्ष पुजाताई जाधव यांच्या हस्ते प्रथम वृक्ष लावून अभियानास प्रारंभ झाला.
या कार्यक्रमासाठी मा. नगरसेविका ऐश्वर्या आशुतोष जाधव, विठ्ठल कोथेरे, विनोद परांडे, चंद्रकांत जंजिरे, संदीप दांगट, शैलेश ननावरे, हणमंत परांडे, बाबूराव टिंगरे, अतुल टिंगरे, बाप्पू सरोदे, ज्योती सावर्डेकर, जितेंद्र कराळेकर, जितेंद्र जगताप, सुभाष पाटील, गणेश सोनवणे, प्रविण दोडके, ज्योती दोरगे, नितीन बर्गे व असंख्य नागरिक उपस्थित होते.