एनसीन फोरम तर्फे उद्योजकता उत्कृष्टता २०२५ पुरस्कार प्रदान
व्हीआयटी पुणे महाविद्यालयात पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पुणे: एनसीन एंटरप्रेन्युअरशिप स्टार्टअप अँड इनोव्हेशन फोरम (एनसीन फोरम), पुणे यांच्या वतीने उद्योजकता उत्कृष्टता पुरस्कार 2025 या उपक्रमाचे आयोजन विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. उद्योजकता, नवोपक्रम आणि सक्षम स्टार्टअप इकोसिस्टिम उभारणीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा या प्रतिष्ठित पुरस्कारांद्वारे सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी व्ही.आय.टी पुणेचे संचालक डॉ. राजेश जालनेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पुष्कराज ग्रुपचे चेअरमन व एमडी श्री. शैलेन्द्र गोस्वामी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. संतोष रंजन, शिरीष कुलकर्णी तसेच एनसीन फोरमचे संचालक डॉ. श्रीकांत कल्लूरकर, श्री. संजय जगताप, व्हीआयटी चे डीन डॉ. विजय माने, प्रा. पंकज कूनेकर आणि इतर प्राध्यापक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. राजेश जालनेकर यांनी विद्यार्थी व संस्थांमध्ये उद्यमशीलता आणि नवोन्मेषाची संस्कृती दृढपणे विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. संतोष रंजन यांनी त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव शेअर करत नवोपक्रमाधारित उद्योजकतेचे महत्त्व स्पष्ट केले. शिरीष कुलकर्णी यांनी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होत असलेल्या परिवर्तनाविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी श्री.शैलेन्द्र गोस्वामी यांनी उद्यमशीलता सक्षमकर्त्यांच्या प्रभावी भूमिकेचे कौतुक करत स्टार्टअप्स सशक्त करण्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य आणि नवोपक्रम यांची गरज व्यक्त केली. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स संस्थेचे चेअरमन श्री. भरत अग्रवाल यांनी या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक करून सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन केले आणि एनसीन फोरमच्या उपक्रमांचे विशेष कौतुक व्यक्त केले.

वैयक्तिक उद्योजकता उत्कृष्टता श्रेणीत उद्योजकता शिक्षण व मार्गदर्शनासाठी डॉ. प्रिया गोखले, डॉ. राकेश सोमाणी, श्री. देवरुत जाधव व श्री. राहुल बाविस्कर; बौद्धिक संपदा प्रशिक्षण व सुविधेसाठी श्री. राजशेखर राठोड, डॉ. हर्षवर्धन पंडित व श्री. विनायक बैरागी; स्टार्टअप इकोसिस्टिम विकासासाठी श्री. सूर्यकांत दोडमिसे, सोनाली सस्ते, अनिता दिवारकर व डॉ. युवराज लाहोटी; महिला उद्योजकता प्रोत्साहनासाठी श्वेता बैद, डॉ. संध्या इंगळे व डॉ. भावना अंबुडकर; विद्यार्थी दूत – नवोपक्रम व उद्योजकता श्रेणीत सुमित कोलपे, आकांक्षा नागमोती, वर्षां गोयल, शिवप्रसाद जाधव, मारू यश, अथर्व पटवर्धन व अथर्व कलासे; तर स्टार्टअपना निधी सहकार्यासाठी मंगल मुधोलकर यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

संस्थात्मक उद्योजक्ता उत्कृष्ठता श्रेणीत व्ही.जे.टी.आय टीबीआय फाउंडेशन मुंबई, गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन, एआयसी–एडीटी बारामती फाउंडेशन, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे, डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, जेएसपीएमचे जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पुणे व एम.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड या संस्थांचा उद्योजकता विकासातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. या प्रेरणादायी समारंभात नवोन्मेषक, उद्योजक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि सर्वांनी मिळून सक्षम, शाश्वत व गतिमान स्टार्टअप इकोसिस्टिम उभारण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
प्रा.श्रध्दा मानकर आणि प्रा.केतकी शिरबाविकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, प्रा. पंकज कुणेकर यांनी आभार मानले



