मलनिस्सारण विभागातील एका उप-अभियंत्याकडे सात पदांचा कार्यभार का?
मनपा या उप-अभियंत्यावर मेहेरबान का? स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांचा सवाल.

स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी महापालिका आयुक्त, दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे ड्रेनेज विभागातील कारभार बाबत तसेच त्या विभागात दहा वर्षाहून अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या उप अभियंता यांच्या बद्दल पत्र व्यवहार करून लक्ष वेधले आहे. उपअभियंता श्री विनायक शिंदे व गणेश पूरम असे या अभियंत्याचे नाव असून. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही मागील दहा वर्षाहून अधिक काळ ड्रेनेज विभागातच कार्यरत आहेत. सर्व्हिस बुक रेकॉर्ड वरून तसे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेकडे असलेले अनेक उपअभियंता यांच्याकडे कोणताही कार्यभार नाही मात्र उप-अभियंता विनायक शिंदे यांच्याकडे तब्बल सात कामाचे कार्यभार आहेत. तर एका कामाचा उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता या दोन्ही कार्यभार त्यांच्याकडे आहेत असे यावेळी सांगण्यात आले आहे.
उप अभियंता विनायक शिंदे यांच्याकडे असलेले कार्यभार पुढील प्रमाणे :-
1) येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मलनिस्सारण उपअभियंता पदाचा चार्ज
2) नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडील मलनिस्सारण उपअभियंता पदाचा चार्ज
3) वाघोली उपअभियंता पदाचा चार्ज
4) सामवेश झालेल्या ११ गावातील प्रकल्पाचा प्रभारी कार्यकरी अभियंता म्हणून चा चार्ज आणि उपअभियंता पदाचा देखील चार्ज
5) २३ गावातील स्ट्रॉंम वॉटर लाईन प्रोजेक्ट उपअभियंता पदाचा चार्ज
6) 23 ड्रेनेज लाईन प्रोजेक्ट उपअभियंता पदाचा चार्ज
7) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आयोग (NDMA project) उपअभियंता पदाचा चार्ज
असे तब्बल सात चार्ज उपअभियंता श्री विनायक शिंदे यांच्याकडे आहेत. एकाच व्यक्तीकडे अनेक चार्ज असल्याने महापालिकेतील उर्वरित अनेक उपअभियंता हे या पदासाठी सक्षम असताना देखील शिंदे हे त्यांची जागा का अडवून बसले आहेत? असा प्रश्न उपस्थीत होतो . यांना ठेकेदारा मार्फत राजकीय नेते मंडळींचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. याशिवाय अधिक चार्ज असल्याने मोठे प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून रखडले आहेत. त्यामुळे पुण्यातील तसेच धानोरी व उपनगरातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत आहे.
शिंदे व पूरम या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली साठी आपण आयुक्तांना दहा दिवसा पूर्वी पत्र दिले होते. त्यानंतर पुन्हा कार्यवाही व्हावी यासाठी स्मरण पत्र देखील दिले असायची माहिती आहे. आयुक्तांनी जर का यांच्यावर कार्यवाही केली नाही तर आपण स्वराज्य पक्षा तर्फे महापालिके समोर आंदोलन करणार आहोत असे यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी ठणकावून सांगितले.
तसेच माध्यमांनी आपल्या मागण्याची योग्य दखल घेऊन महापालिकेचा भोंगळ कारभार चव्ह्यावर आणून प्रशासनास जागे करावे असे आवाहन देखील यावेळी प्रसारमाध्यमांना करण्यात आले आहे.