हिमगिरीयन्स ग्रुप तर्फे भव्य रक्तदान महाशिबिराचे आयोजन.
रक्तदान महाशिबिराचे यंदाचे सातवे वर्ष, आतापर्यंत एकूण ११७७ पिशव्यांचे रक्त संकलन झाले.

सालाबादप्रमाणे हिमगिरीयन्स ग्रुप मार्फत रविवार, दिनांक २९ जून रोजी मोरया उद्यान विद्यानगर येथे भव्य रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याआधी देखील रक्तदान शिबिराचे तब्बल ६ उपक्रम हिमगिरीयन्स ग्रुपने यशस्वीरित्या पार पाडले आहेत.
विद्यानगर भागातील हिमगिरी विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या या ग्रुप मार्फत अनेक समाजसेवी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, दिंडीतील वारकर्यांना अन्नदान, आरोग्य शिबीर यांसारखे विविध कार्य आहेत.
यांदाचे हे रक्तदान शिबिराचे सातवे वर्ष असल्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी हिमगिरीयन्स ग्रुपच्या आयोजक कमिटीने अहोरात्र काम केले. तर समाजामध्ये रक्तदान शिबिरा विषयी जनजागृती होण्याच्या उद्देशाने हिमगिरी विद्यालयाच्या सर्व माजी शिक्षकांनी चित्रफीतीच्या माध्यमातून या भव्य रक्तदान महाशिबिराचे महत्व पटवून देण्याचे कार्य केले.
हिमगिरीयन्स ग्रुपच्या या भव्य रक्तदान महाशिबिराला अनेक माजी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनी, मित्रमंडळींनी, परिचितांनी तसेच सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. यांदाच्यावेळी तब्बल १०८ युनिट रक्तसंकलन करण्यात आले असून आतापर्यंत एकूण ११७७ पिशव्यांचे रक्त संकलन झाले.
ससून रक्तकेंद्र, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे प्रत्येक पर्व यशस्वीरीत्या पडत असून या महान कार्यात ससून रुग्णालयाचे श्री शरद देसले सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष योगदान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सातव्या पर्वाच्या या रक्तदान शिबिराला हिमगिरी विद्यालयाचे माजी शिक्षक श्री. दत्तात्रय बांडे सर, श्री. यज्ञकांत ढगे सर, श्री. काळे सर (संस्कृत विषय), श्री. सुभाष भापकर सर, श्री. गवाळे सर, श्री. विक्रम काळे सर, श्री. मछिंद्रनाथ करंजकर सर, श्री. खिल्लारे भाऊसाहेब सर, सौ. पाताळे मॅडम, सौ. पिंगळे मॅडम, सौ. पिंगळे मॅडम, सौ. परदेशी मॅडम, सौ. मानेरे मॅडम आदींनी उपस्थित राहून सर्वांचा उत्साह वाढविला. यावेळी पुढील पर्वाचे नियोजन अधिक कटाक्षाने करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले याप्रसंगी हिमगिरीयन्स परिवाराकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.