पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये श्रावण महिन्याच्या निमित्ताने विशेष उपक्रम…!
तब्बल ११,००० पालेभाज्यांचे मोफत वाटप...!

पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये श्रावण महिन्याच्या निमित्ताने तब्बल अकरा हजार पालेभाज्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनच्या अध्यक्षा पुजा जाधव यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
श्रावण महिना म्हणजे हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र असा महिना मानला जातो. या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी अनेक जण महादेवाची पूजा अर्चा करून उपवास करतात. यामध्ये दिवसभर उपवासाचे पदार्थ ग्रहण केले जातात तर सायंकाळी पंचपक्वानासहित उपवास सोडला जातो यावेळी पालेभाज्यांचा आवडीने केल्या जातात. त्यामुळे श्रावण सोमवारच्या उपवासानिमित्त धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशन च्या वतीने व पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील ईच्छुक उमेदवार सौ.पुजाताई जाधव यांच्या पुढाकारातून कळस, विश्रांतवाडी, धानोरी, भैरवनगर, मुंजाबावस्ती आणि लोहगाव परिसरातील नागरिकांना तब्बल ११,००० पालेभाज्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या मध्ये मेथी, पालक, राजगिरा व शेपू या पालेभाज्यांचा समावेश होता.
या विषयी अधिक माहिती सांगताना सौ.पुजाताई जाधव म्हणाल्या पवित्र श्रावण महिन्यात पालेभाज्यांना महत्व आहे तसेच पालेभाज्या ह्या नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
यातच पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे जवळ जवळ सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने नागरिकांशी संपर्क वाढवता यावा यासाठी निरनिराळ्या योजना राबवून शर्तीचे प्रयत्न करीत असताना मोघम खर्च करण्यापेक्षा नागरिकांना थेट घरोघरी मोफत पालेभाज्या वाटप करत इच्छुक उमेदवार सौ पुजाताई जाधव यांनी नागरिकांशी चांगलाच संपर्क वाढविल्याचे पाहायला मिळत आहे.