संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान :
मनांच्या दिंड्यांसोबत, टाळ, मृदूंग आणि माउली माउलीच्या जयघोषात असंख्य वारकऱ्यांसह पालखी निघाली पंढरीला

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. अनेक काळापासून चालत आलेल्या या पालखी सोहळ्याची दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्याजोगीच आहेत, या पालखी सोहळ्यात सहभागी झालेला प्रत्येक जण डोळ्याचे पारणे फिटे पर्यंत या सोहळ्याचा आनंद घेत असतो, लहान, मोठे, तरुण, वृद्ध, महिला सर्व या माउलींच्या पालखी सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात.
आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातील विश्रांतवाडी चौकातून मानांच्या दिंड्यां, वारकरयांसह, टाळ, मृदूंग आणि माउली माउलीच्या जयघोषात पंढरीला निघाली.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये संगम झाला या दोन्ही पालख्या पुण्यातील संगमवाडी पुलाजवळ एकत्र येत असल्यातरी दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये स्वतंत्र ठिकाणी विसावा असतो, पुढे हडपसर पासून दोन्ही पालख्या आपला मार्ग बदलतात व वाखारी या ठिकाणी पुन्हा एकत्र येतात. याठिकाणी दोन्ही पालख्यांचे मनोमिलन होऊन पुढे या पालख्या एकत्र पांढरपुरला जातात, आषाढी एकादशीला सर्व वारकरी आपल्या माय-बाप सावळ्या विठुरायाचे मनोभावे दर्शन घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ होतात.
पालखी सोहळ्यात पुण्यनगरीतील अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी अन्नदान, पाणी, बिस्कीट पुडे , छत्री, कापडी पिशव्यांचे वाटप केले तर काहींनी वारकरयांसाठी औषधे व आरोग्यशिबिराचे नियोजन केले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील जागोजागी सुरक्षा रक्षक नेमून वारकरयांना, दिंडीतील वाहनांना जाण्यासाठी मार्गदर्शन केले तर पालिकेच्यावतीने पालखी मार्गात झालेला कचरा साफ करण्यासाठी स्वच्छता प्रतिनिधी नेमण्यात आले.
यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने वेगळीच शक्कल लढवण्यात आली समाजात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे त्याअनुषंगाने जनजागृती म्हणून त्यांनी काही घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले यात एक दोन तीन चार व्यसनमुक्तीचा करू प्रचार, बघताय काय सामील व्हा, दारूची बाटली फुटलीच पाहिजे, तंबाखूची पुडी फेकलीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या असंख्य दिंड्या, विविध पालख्या, ज्ञानेश्वर माउलींच्या नगारखाण्याचा रथ, माउलींच्या पालखीचा मानाचा घोडा, विठुरायाच्या जयघोषात बेधुंद हरवलेला वारकरी वैष्णवांचा मेळा व प्रत्यक्षात पालखी सोहळाची दृश्य मल्हार वृत्तच्या खास प्रेक्षकांसाठी वरील लिंकमध्ये .