धानोरी परिसरातील कचरा प्रश्न ऐरणीवर : नालेसफाईची कामे देखील अपूर्णच
परिसरातील कचरा रोज सकाळी लवकर उचला अन्यथा सह आयुक्तांच्या दारात कचरा टाकू

धनोरी परिसरातील कचरा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे या परिसरातील कचरा रोज सकाळी लवकर उचला अन्यथा सह आयुक्तांच्या दारात कचरा टाकू; असा इशारा पुजा जाधव यांनी दिला.
येरवडा क्षेत्रीय कार्यालय येथे धानोरी कळस, विश्रांतवाडी, मुंजाबावस्ती सर्वच भागातील कचरा प्रश्नांबाबत येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालय सह आयुक्त अशोक भवारी व उप अभियंता चंद्रशेन नागटिळक यांनी सर्व DSI व SI कर्मचारी यांची एकत्रित महत्वपूर्ण बैठक धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनच्या अध्यक्षा पुजाताई जाधव यांच्या समावेत घेतली.
धानोरी परिसरातील सर्वच भागात कचऱयाचे ढीग साचले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नियमित कचरा उचलणाऱ्या गाड्यात येत नाहीत. व दुसरी कुठली व्यवस्था नसल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकावा लागतो. सोबतच जो कचरा रोडवर पडतो तो सकाळी लवकर उचलला जात नाही. तसेच जो कचरा एकत्र गोळा करून आणला जातो तो मुख्य रस्त्यावरच वेगवेगळा करण्याचे काम केले जाते त्यामुळे सर्व परिसर दुर्गंधीयुक्त होतो. त्यामुळे हा कचरा वेगवेगळा करण्यासाठी मनपाने योग्य जागा निवडाव्यात, कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कर्मचारीवर्ग वाढवावा. विशेषतः जर परिसरातील असणाऱ्या सर्व शाळां समोर साचणारा कचरा बंद झाला नाही तर तोच कचरा विद्यार्थ्यांसोबत घेऊन थेट तुमच्या दालनासमोर टाकला जाईल हे पुजा जाधव यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
या प्रश्नाबाबत आज येरवडा क्षेत्रीय कार्यालय येथे बैठक पार पडली असून, जर पुढील ८ दिवसांत धानोरी परिसर कचरा मुक्त झाला नाही तर सह आयुक्तांच्या दालनात कचरा टाकू असा इशारा दिला आहे.