श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

पुण्यनगरीतील संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेल्या लोहगांव येथील श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज मंदिराचा समाधी सोहळा दिनांक २३ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला, या सोहळ्याची सुरवात सकाळी ६ वाजता श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज्यांच्या मूर्तीची अभिषेक व पुजा करून करण्यात आली, तर सायंकाळी ४ वाजता भजन, ६ वाजता आरती व सायंकाळी ७ नंतर महाप्रसाद यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
या सोहळ्याचे आयोजन सावतामाळी तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे पदाधिकारी आकाश तळेकर, अभिषेक घोरपडे, सुरज तळेकर, आकाश गरुड, अभिनव तळेकर, यश तळेकर, सत्यम तळेकर, तेजस लोंढे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळींनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.