संपादकीय

हिमगिरी विद्यालयाचा शिक्षक सेवापूर्ती समारंभ, माजी विद्यार्थी गौरव समारंभ व मेळावा संपन्न…!

पुण्यातील टिंगरेनगर परिसरातील हिमगिरी विद्यालयाचे शिक्षक श्री. जयकर शिवाजी गवाळे सर यांचा सेवापूर्ती समारंभ, माजी विद्यार्थी गौरव समारंभ व मेळावा भैरवनगर येथील ओम चैतन्य गगनगिरी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

 

एकेकाळी आपल्या कडक शिक्षण व शिस्तीसाठी ओळखली जाणारी हिमगिरी विद्यालय हि शाळा सन २०१९ मध्ये काही कारणास्तव बंद झाली, शाळा बंद असली तरी या शाळेतील शिक्षक व सर्व माजी विद्यार्थी यांचा ऋणानुबंध जपण्याच्या उद्देशाने गेली अनेक वर्षे विविध माध्यमातून समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात यामध्ये वृक्ष लागवड, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, शैक्षणीक फी, कोरोना काळात गरजुंना धान्य वाटप, माजी विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत, दिवंगत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदत, वारकऱ्यांसाठी अन्नदान, चिक्की वाटप असे अनेक कार्यक्रम राबविले जातात.

 

 

त्याचबरोबर गेल्यावर्षीपासून शाळेतील शिक्षक श्री यज्ञकांत ढगे सर व श्री. दत्तात्रय बांडे सर यांच्या पुढाकाराने सर्व शिक्षकवर्ग व माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त एकत्र येत आहेत, या मेळाव्यामध्ये शाळेतील सर्व शिक्षकवर्ग ज्यांनी अनेक विद्यार्थी घडविले त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा, तसेच विद्यालयातील असे विद्यार्थी ज्यांनी सामाजिक, राजकीय, सहकार, वैद्यकीय, कला-क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, कायदा-सुरक्षा, व्यावसायीक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व गौरवास्पद कामगिरी करून एक उंच शिखरं गाठले आहे अशा विद्यार्थ्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.

 

 

यंदाच्या कार्यक्रमाची सुरवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन उपास्थीत मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. सुरवसे बाई, उपस्थित मान्यवर श्री. चंद्रकांत टिंगरे, सौ. रेखाताई टिंगरे, श्री. सुनील टिंगरे, श्री. राजेंद्र घुंडरे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच गतवर्षात शाळेतील काही शिक्षक व माजी विद्यार्थी यांना देवाज्ञा झाली अशा सर्व दिवंगत आत्म्यास दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

 

यावेळी शाळेचे शिक्षक श्री जयकर गवाळे सर यांचा सेवापुर्ती सत्कार यांच्या सेवाकार्याचा थोडक्यात परिचय देऊन कार्यक्रमाचे मान्यवर श्री. चंद्रकांत टिंगरे व सौ. रेखाताई टिंगरे यांच्या हस्ते मानपत्र, वृक्ष व रेखाचित्रं देऊन करण्यात आला. यानंतर गेल्यावर्षात समाजासाठी बहुमोल कामगिरी करण्याऱ्या वेगवेळ्या क्षेत्रातील १३ माजी विद्यार्थ्यांचे औक्षण माजी विद्यार्थीनींनी केले व शिक्षकांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये श्री महेश पडवळ, श्री संजय चव्हाण, श्री राकेश मोरे, सौ मनीषा साखरे, सौ प्रिती माने, श्री संजय पाचाडकर, सौ संजीवनी कापरे, सौ लक्ष्मी औचारे, श्री मुकेश शहारे, श्री प्रदीप निचल, श्री अमित देवकर, श्री महेश गोपाळ खिलारी, श्री रविकांत नंदनवर, श्री शेखर परब, श्री निलेश जेजुरीकर, श्री धनंजय जाधव यांचा समावेश होता.

 

 

 

यानंतर सर्व प्रमुख मान्यवर व शिक्षकांनी आपली शाळा बंद झाली असली तरी आपल्या शाळेचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पुढच्या पिढीला द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी काही कानमंत्र दिले तर सत्कार झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अनेक विद्यार्थ्यांना आपले जुने शाळेचे दिवस, प्रसंग आठवून आश्रू अनावर झाले.

 

 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री यज्ञकांत ढगे सर यांनी केले व श्री. दत्तात्रय बांडे सर यांनी प्रमाणपत्राचे वाचन करून सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री दिनेश चौधरी यांनी आयोजकांचे व उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेऊन एकमेकांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या व शिक्षकांसोबत चित्रफीत घेऊन आठवणी साठवून ठेवल्या.

 

Back to top button
Don`t copy text!