राजकीय
पूजाताई जाधव यांचे आयुक्तांना निवेदन
धानोरी, मुंजाबावस्ती, टिंगरेनगर परिसरातील नालेसफाईच्या प्रश्नावर निवेदन

धानोरी, मुंजाबावस्ती, टिंगरेनगर परिसरात नालेसफाईच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो, दुर्गंधी व रोगराई पसरू शकते, यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक नवल किशोर राम यांना भेटून निवेदन दिले.
तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कामात कुचराई करत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना कराव्यात अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी पुणे मनपा चे मा.वृक्ष प्राधिकरण सभासद धनंजय जाधव ,सौ.पूजाताई जाधव गणेशदादा सोनवणे, प्रणय शेंडे, दादाराव बोबडे, ओंकार येनपुरे, विक्रम कदम , द्वारकेश जाधव उपस्थित होते.