राजकीय

धानोरी व उपनगरात पूरस्थिती निर्माण झाल्यास ठेकेदार, प्रशासन व भ्रष्टाचारी अधिकारी जबाबदार – सौ. पुजा धनंजय जाधव

मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर, प्रशासन जागे झाले व प्रत्यक्षात नालेसफाईला झाली सुरुवात.

 

मिळालेल्या माहिती नुसार गेल्या अनेक दिवसांपासून धानोरी, मुंजाबावस्ती, टिंगरेनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते, याबाबत २ दिवसांपुर्वी पुणे मनपा आयुक्तांची भेट घेवून, नालेसफाई करण्याबाबत सौ. पुजा धनंजय जाधव यांनी निवेदन दिले होते.

त्या अनुषंगाने आज प्रत्यक्षात मनपाचे अधिकारी अक्षय वाडेकर यांच्यासोबत २९ गोल्ड कोस्ट सोसायटी, सुदामानगर, लक्ष्मीनगर सोसायटी, विठ्ठल मंदिर धानोरी येथील भागातून वाहणार्‍या नाल्यास अनेक ठिकाणी भेटी दिल्या, यातून असे निर्दशनास आले की, निर्मल हरिहर या ठेकेदाराच्या माध्यमातून नालेसफाई करण्याचे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात काम झालेच नव्हते. मुसळधार पाऊस सुरु होण्याआधी जर हा नाला साफ झाला नाही तर सध्या नाल्यात असलेला राडारोडा व प्लॅस्टिक, कपडे यामुळे पाणी तुंबेल व सर्व परिसर पाण्याखाली जाईल तसेच येथील रहिवासी व व्यापारी बांधवांना मोठा त्रास होणार आहे.

यापूर्वी देखील अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही अजूनपर्यंत मनपा अधिकारी फक्त पाहण्याच्या भुमिकेत होते यामुळे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, याभागातील नालेसफाई हि केवळ नावालाच झाली असून यामध्ये केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो. आज श्री धनंजय जाधव, सौ. पुजा जाधव, विनोद परांडे, गणेश सोनवणे, अरुण उर्फ बंडुशेठ कानसकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर, प्रशासन जागे झाले व प्रत्यक्षात नालेसफाईला सुरुवात झाली.

याप्रसंगी सौ. पुजा धनंजय जाधव यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास तुम्ही सक्षम नसाल तर जाहीर करा पण नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर गाठ आमच्याशी आहे. वर्षानुवर्षे याच विभागात ठान मांडून व बदली झाली तरी अतिरिक्त चार्ज घेऊन अनेकदा बसलेल्या ज्या अधिकाऱ्यांनी या कामात भ्रष्टाचार केला आहे त्यांचे निलंबन व्हावे अन्यथा त्यांना या खात्यातून हाकलून द्यावे. तसे नझाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

या वेळी प्रणय शेंडे, समीर सय्यद, द्वारकेश जाधव, कुणाल शिंदे, विक्रम कदम, लक्ष्मण वडणे, पवन मोरे, अजित बाबळसुरे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!